सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत धर्शन गलीवेटचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

मुंबई: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात तेलंगणाच्या धर्शन गलीवेट याने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजववाला.

जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात क्वालिफायर बिगरमानांकीत तेलंगणाच्या  धर्शन गलीवेट याने अव्वल मानांकित हरियाणाच्या वंश नंदाचा 6-2, 6-2असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.

तामिळनाडूच्या ऋषी सादिशकुमारने हरियाणाच्या तेजस आहुजाचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(4)असा पराभव करून आगेकूच केली.  महाराष्ट्राच्या  काहीर वारिकने आपला राज्य सहकारी पार्थ देवरुखकरचा 6-1, 6-0 असा, तर  आर्यन सुतारने हरियाणाच्या अर्जुन राठीचा 6-3, 6-1असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या  अलिशा देवगावकरने दिल्लीच्या दिव्या उंगरीशचा 6-0,6-0असा एकतर्फी पराभव केला. महाराष्ट्राच्या सानिका भोगाडेने चंदीगडच्या विशिता कुमारचा 6-3,6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

आकांक्षा अग्निहोत्रीने जेनिका जैसनवर 6-2,6-1अशा फरकाने विजय मिळवला. आंध्रप्रदेशच्या लक्ष्मी बोगालाने पश्चिम बंगालच्या लुई चार्लोटीचे आव्हान टायब्रेकमध्ये 7-6(1), 7-5असे मोडीत काढले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:  

पहिली फेरी: 12वर्षाखालील मुली:

सौमित्रा वर्मा(उत्तरप्रदेश)वि.वि.टिना शर्मा(हरियाणा)6-2,6-1; अलिशा देवगावकर(महा)वि.वि.दिव्या उंगरीश(दिल्ली)6-0,6-0; अनन्या भाटिया(गुजरात)वि.वि.इनायत रॉय(पंजाब)7-6(6),5-7,7-5; सानिका भोगाडे(महा)वि.वि.विशिता कुमार(चंदीगड) 6-3,6-2;

आकांक्षा अग्निहोत्री वि.वि.जेनिका जैसन(महा)6-2,6-1; चार्मी गोपीनाथ(कर्नाटक)वि.वि.शिवानी जी(तेलंगणा)2-6,6-2,7-5; कनुमरी इकराजू(तेलंगणा)वि.वि.ध्वनी कावड(गुजरात)6-3,6-2;    संजना देवीनेनी(कर्नाटक)वि.वि.आनंदी भुतडा6-0,6-3; अमोदीनी नाईक(कर्नाटक)वि.वि.ज्योशिता अमुथा(तामिळनाडू)6-1, 6-4;

लक्ष्मी बोगाला(आंध्रप्रदेश)वि.वि.लुई चार्लोटी(पश्चिम बंगाल)7-6(1), 7-5; स्वरा काटकर(महा)वि.वि.प्रतिष्टा सैनी(पंजाब)6-0, 6-0;  प्राप्ती पाटील(महा)वि.वि.सुमेरा जैस्वाल(पश्चिम बंगाल)6-3, 6-1;  अहाना कौर(दिल्ली)वि.वि.कृतिका(हरियाणा)2-6, 6-4, 6-1; आस्मि आडकर(महा)वि.वि.सान्वी गर्ग(दिल्ली)6-0, 6-0;   ह्रिती आहुजा(महा)वि.वि.तमन्ना सैनी(हरियाणा)6-1, 6-2;

12वर्षाखालील मुले:

धर्शन गलीवेट(तेलंगणा)वि.वि.वंश नंदा(हरियाणा)(1)6-2, 6-2; स्मित पटेल(गुजरात)वि.वि.ध्रुव अगरवाल(पंजाब) 6-2, 6-1; ऋषी सादिशकुमार(तामिळनाडू)वि.वि.तेजस आहुजा(हरियाणा)7-5, 7-6(4); अर्णव मनराळ(पश्चिम बंगाल)वि.वि.ध्रुव कुमार(दिल्ली)3-6, 6-2, 6-3;

रोहन अगरवाल(पश्चिम बंगाल)वि.वि.स्वरमन्यु सिंग(महा)6-2, 6-0; नील जोगळेकर(महा)वि.वि.फतेहाब सिंग(हरियाणा)6-2, 6-1;   देबसीस साहू(पंजाब)(7)वि.वि.भरत फुलवारीया(राजस्थान)7-5, 7-6(5); हर्ष फोगट(दिल्ली)(3)वि.वि.वैभव श्रीराम(कर्नाटक)6-0, 6-1; केवल किरपेकर(महा)वि.वि.अनिकेत वेंकटरामण(तामिळनाडू)6-0, 6-0;मुस्तफा राजा(कर्नाटक)(16)वि.वि.याग्न पटेल(गुजरात)6-4, 4-6, 7-6(5);

प्रणव रेथीन(तामिळनाडू)(9)वि.वि.विनीत मूत्याला(तेलंगणा) 2-6, 6-4, 6-3; आदित्य तलाठी(महा)वि.वि.सप्तरीशी धीमान 6-1, 6-1; काहीर वारिक(महा)वि.वि.पार्थ देवरुखकर(महा)6-1, 6-0; आर्यन सुतार(महा)वि.वि.अर्जुन राठी(हरियाणा) 6-3, 6-1.