पहिली कसोटी: शिखर धवनचे शतक ६ धावांनी हुकले

कोलकाता । येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर शिखर धवनचे शतक केवळ ६ धावांनी हुकले.

शिखर धवनने ११५ चेंडूत ९४धावा करताना ११ चौकार आणि २ षटकार खेचले.

ज्यावेळी केएल राहुल 50 धावांवर खेळत होता तेव्हा शिखर धवन 34 धावांवर खेळत होता. परंतु अर्धशतकी खेळी केल्यावर त्याने वेगवान धावा जमवल्या.

त्याचे शतक जरी ६ धावांनी हुकले असले तरी जेव्हा तो ९४ धावांवर बाद झाला तेव्हा केएल राहुल धावांवर ७० नाबाद होता. यावरून त्याच्या वेगवान खेळीचा अंदाज येतो.

सद्यस्थितीत भारताच्या ३७ षटकांत १ बाद १६६ धावा झाल्या असून संघाकडे ४४ धावांची आघाडी आहे.