एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात काल (१२ जानेवारी) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एमएस धोनीसोबत १३७ धावांची भागीदारी केली होती.

या सामन्यातील धोनीची फलंदाजी बघता त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे अशी इच्छा रोहितने व्यक्त केली आहे.

“धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर संघासाठी चांगलेच आहे. मात्र अंबाती रायडूमुळे तो नेहमीच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकणार नाही”, असे रोहित म्हणाला.

“धोनीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचे हे सगळे कर्णधार आणि प्रशिक्षकावर अवलंबून आहे. मात्र तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर मला आनंदच होईल”, असेही रोहित पुढे म्हणाला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३.५ षटकातच ४ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना रोहितला चांगली साथ दिली होती.

या दोघांनी 4/3 वरून सामना 141/3 असा केला होता. यामध्ये धोनीने ९६ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या. तर रोहितने १३३ धावांची शतकी खेळी केली होती.

या सामन्यातील धोनीच्या स्ट्राईक रेटवर टिका केली जात आहे. त्याचा नेहमीचा स्ट्राईक रेट ८५-९० या दरम्यान असतो. मात्र या सामन्यात त्याने ५० आसपासच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

“धोनीचा नेहमीचा स्ट्राईक रेट ९०च्या आसपास असतो. मात्र तो फलंदाजीला आला असता आम्ही आधीच तीन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीही भेदक होती. म्हणून यावेळी आमचे लक्ष फक्त चांगली भागीदारी करण्यावर होते”, असे रोहितने धोनीच्या टीकाकरांना उत्तर दिले

महत्त्वाच्या बातम्या-

त्या एका चेंडूमुळे भारताला सिडनी सामना गमवावा लागला…

विश्वचषक गाजवलेल्या खेळाडूला मिळाले न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान

रोहित शर्माने किंग कोहलीचाही विक्रम टाकला मागे, आता फक्त तेंडुलकर आहे पुढे