धोनीच्या या निर्णयाने खलील अहमद झाला निशब्द

एशिया कप स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत 7 व्यांदा ही स्पर्धा जिंकली.

सामना संपल्यानंतर धोनीने कर्णधार रोहित शर्माला चषक संघात पदार्पण करणाऱ्या खलील अहमदच्या हातात द्यायला सांगितले.

”जेव्हा धोनी आणि रोहितने मला ट्राॅफी घेण्याबाबत विचारले तेव्हा आपल्याकडे शब्दच नव्हते. हा क्षण आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय होता.” असे खलील अहमदने टाइम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

खलील अहमदने एशिया कप स्पर्धेत हाॅंगकाॅंगविरूद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. पदार्पणातच डावखुऱ्या खलीलने 48 धावात 3 विकेट घेतल्या होत्या.

भारतीय संघातील दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी हा आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. धोनीने मैदानावर आणि मैदानबाहेरही आपल्या अचूक निर्णय क्षमतेने सर्वांना चकीत केले आहे. धोनीने 200 वन-डे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. अशी कामगिरी करणारा तो अशिया खंडातील पहिलाच कर्णधार ठरला आहे.

आयसीसीचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2013, टी-20 विश्वचषक 2007, आणि विश्वचषक स्पर्धा 2011 या मोठ्या स्पर्धा भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच कर्णधार ठरलेला आहे.

महत्वाच्या बातम्या-