सचिनच्या निवृत्तीच्या भाषणानंतर भावुक झाले होते करुणानिधी

डीएमके पक्षाचे नेते आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांचे मंगळवारी, 7 आॅगस्टला वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.

करुणानिधी हे भारतीय क्रिकेट संघाचे आणि क्रिकेटचे खुप मोठे चाहते होते. ते क्रिकेट सामने बऱ्याचदा न चुकता बघायचे.

त्यांनी 2014 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र वाचतानाचा फोटोही ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यांनी सचिनचे बऱ्याचदा कौतुकही केले आहे. तसेच सचिनचे शेवटच्या सामन्यानंतरचे भाषण भावनिक होते असेही ते म्हणाले होते.

करुणानिधी हे त्यांच्या कामात कितीही व्यस्त असले तरी क्रिकेटसाठी वेळ काढायचे. याबद्दल त्यांची मुलगी कनिमोळी यांनी सांगितले होते की ते जेव्हा प्रवासात असायचे किंवा कोणत्या मिटींगमध्ये व्यस्त असायचे तेव्हा घरी फोन करुन नेहमी सामन्याबद्दल माहिती विचारायचे.

तसेच काहीवेळा तर ते जर कोणता महत्त्वाचा सामना असेल तर त्यांचे काही आपॉइंटमेंट्सच्या वेळेत बदल करायचे किंवा त्या रद्द करत. त्याचबरोबर ते कोणालातरी बरोबर घेऊन सामना पहायचे. मग यात कधीकधी त्यांची भेट घ्यायला आलेले जिल्हा सचिवही असायचे.

करुणानिधी हे क्रिकेटबद्दल नेहमीच चर्चा करायचे, असेही कनिमोझी यांनी सांगितले.

भारतीय संघाचा जर पराभव झाला तरी करुणानिधींना क्रिकेट चाहत्यांप्रमाणे वाईट वाटायचे. काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांचा आवडता खेळाडू कोणता असे विचारल्यावर त्यांनी बालाजी असे उत्तर दिले होते.

तसेच ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांचेही चाहते होते. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचेही ते चाहते होते.

त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचे सामने पहाण्यासाठी बऱ्याचदा स्टेडीयममध्ये हजेरी लावायचे. परंतू काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे स्टेडीयममध्ये जाणे बंद झाले.

करुणानिधी यांनी 2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर धोनी आणि भारतीय संघाला 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच त्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तमिळनाडूच्या असणाऱ्या आर अश्विनला त्यांनी 1 कोटी बक्षीस म्हणून दिले होते.

त्यांना भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांचाही खुप अभिमान होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

उपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल

वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी

बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता