धोनी आणि ९९ हे नातं काही खास !

भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार एमएस धोनी आज आपला ३०० वा वनडे सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा ६वा खेळाडू बनणार आहे.

सध्या धोनी आणि ९९ यांचं खास नातं या सामन्यात पाहायला मिळणार आहे. धोनी आजपर्यंत २९९ वनडे सामने खेळला आहे. त्यात त्याने १९९ सामन्यात कर्णधार म्हणून म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

त्याने जागतिक वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टिचित केले आहेत. तोही आकडा ९९ आहे. धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये ९९ अर्धशतके केली आहे. धोनीने जर आज एक यष्टिचित आणि अर्धशतक केले तर त्याच हे ९९च नातं पुसलं जाणार आहे.

आज हा महान खेळाडू ३००वा वनडे सामना खेळणार आहे. याबरोबर अशी कामगिरी करणारा तो जगातील २०वा खेळाडू बनणार आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर(४६३), राहुल द्रविड (३४४), मोहम्मद अझरुद्दीन(३३४), सौरव गांगुली(३११) आणि युवराज सिंग(३०४) या खेळाडूंनी यापूर्वी ३०० सामने खेळले आहेत. चितगावला २३ डिसेंबर २००४ साली बांगलादेश संघाविरुद्ध वनडे पदार्पण धोनीने पदार्पण केले होते.