“धोनी पंडयापॆक्षा हजारपट चांगला फिनिशर”

भारताचे माजी कसोटीपटू करसन घावरी यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला हार्दिक पंड्यापेक्षा हजारपट चांगले क्रिकेटर म्हटले आहे. धोनी हा पंड्यापेक्षा कोसो पुढे गेला असल्याचंही घावरी म्हणाले.

“कृपया धोनी आणि पंड्याची तुलना करू नका. हे खरं आहे की पंड्या भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. परंतु तो आताच कुठे संघात आला आहे. धोनीने गेली अनेक वर्ष स्वतःला सिद्ध केलं आहे. ” असे घावरी म्हणाले.

“एक फिनिशर म्हणून धोनीची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. तो १००० हजारपट पंड्यापेक्षा चांगला फिनिशर आहे. आजही धोनी ४-५ षटकांत सामना फिरवू शकतो. ” असे म्हणत त्यांनी धोनीची महानता अधोरेखित केली.

करसन घावरी भारताकडून ३९ कसोटी आणि १९ वनडे सामने खेळले. त्यात त्यांनी १२४ बळी मिळवले आहेत.