संघाला विजय मिळवून देण्यात धोनीच जगात सर्वात पुढे

एमएस धोनी म्हणलं की संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून देणारा जादूगार. गेले अनेक वर्ष हे भारतीय संघासाठी एक मोठं समीकरण झालं होत.

परंतु गेले काही महिने हा खेळाडू आपल्या जुन्या लयीत नसल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होत्या. परंतु काल पुन्हा एकदा या दिग्गजाने आपण भारतीय संघात का आहोत हे दाखवून दिले. आपण संघातील जागा ही भूतकाळावर नाही तर आपल्या कामगिरीवर मिळवली आहे हे धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले.

धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून देताना धोनीचं सरस
एकावेळी ऑस्ट्रेलियाच्या मायकल बेवनला मॅच विनर खेळाडू संबोधलं जायचं. त्यांनतर असा खेळाडू होणार नाही याचीही चर्चा झाली. परंतु धोनीने पुढे जाऊन हे सर्व विक्रम आपल्या नावे केले. धावांचा पाठलाग करताना कमीतकमी १००० धावा केलेल्या खेळाडूंमध्ये धोनीची सरासरी आहे ९९.१६. ही सरासरी जगातील सर्व खेळाडूंमध्ये उत्तम आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरही भारताचाच खेळाडू आहे आणि तो म्हणजे विराट कोहली(९७.६८). त्यांनतर मायकल बेवन(८६.२५) आणि एबी डिव्हिलिअर्स(८४.६६) यांचा क्रमांक लागतो.

धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून देताना धोनीचं सर्वाधिक वेळा नाबाद
सरासरीप्रमाणेच धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून देताना धोनीचं सर्वाधिक वेळा नाबाद राहिला आहे. त्याने तब्बल ३९वेळा वनडेमध्ये नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सच्या नावे होता. तो ३३ वेळा नाबाद राहिला होता. त्यांनतर ३२ वेळा इंझमाम उल हक, ३१ वेळा रिकी पॉन्टिंग आणि ३०वेळा जॅक कॅलिस व मोहम्मद अझरुद्दीनचा असा नंबर लागतो.