धोनी जगात कुणालाही षटकार मारु शकतो पण या गोलंदाजाला नाही

पुणे | आयपीएलचा हा हंगाम धोनीचाच अशी स्वप्नवत वाटचाल या दिग्गज खेळाडूची सध्या सुरू आहे. या मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचव्या स्थानी विराजमान होणे हे ३७ वर्षीय धोनीसाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे.

असे असले तरी आयपीएलमध्ये एक विचित्र रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला आहे.

कोलकाताचा फिरकीपटू सुनील नारायणने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर धोनीला चांगलेच पळवले आहे.

Read- पुजारा-रुटच्या संघावर ४५ वर्षांतील सर्वात मोठी नामुष्की

आयपीएलमध्ये सुनील नारायण हा असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने टाकलेले ५० चेंडू खेळुनही धोनीला त्यावर अजून षटकार मारता आला नाही. तसेच एखाद्या गोलंदाजाचे ५० चेंडू खेळूनही त्याला एकही षटकार न मारणारा धोनी आयपीएलमधील पहिलाच फलंदाज बनला आहे.

त्याने आजपर्यंत नारायणचे ५२ चेंडू खेळले आहेत. त्यात त्याने २५ धावा केल्या आहेत.

आयपीएलचे १६८ सामने खेळणाऱ्या, त्यात ३८९० धावा करणाऱ्या आणि याच आयपीएलमध्ये तब्बल १८० षटकार खेचणाऱ्या धोनीला कोलकाताच्या सुनील नारायणला एकही षटकार मारता यावा नाही ही नक्कीच धोनी चाहत्यांनी अचंबीत करणारी गोष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या –