एमएस धोनीवर सुनील गावसकर पाठोपाठ या दिग्गज क्रिकेटपटूचाही हल्लाबोल

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर पाठोपाठ दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनीही एमएस धोनी आणि इतर भारतीय क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे असे म्हटले आहे.

धोनीला विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतून खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. त्याने कसोटी क्रिकेटमधून 2014मध्ये निवृत्ती घेतली असल्याने तो फक्त वन-डे क्रिकेटसाठी उपलब्ध आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पुढील महिन्यात तीन वन-डे सामने खेळणार असल्याने धोनीकडे सध्या रिकामा वेळ आहे. यादरम्यान त्याने 50 षटकांचे विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळावे असे मत अमरनाथ यांनी मांडले आहे.

“जर तुम्हाला भारतीय संघात यायचे असेल तर तुम्ही आधी आपल्या राज्याकडून खेळा. संघात निवड होण्यासाठी खेळाडूला त्याचा फॉर्म कायम ठेवणे गरजेचे असते”, असे परखड वक्तव्य अमरनाथ यांनी केले आहे.

“तुम्ही देशाकडून एकाच प्रकारच्या क्रिकेट सामन्यात खेळत असाल तर देशांतर्गत क्रिकेटचे सर्व प्रकारचे सामने खेळावे”, असेही अमरनाथ म्हणाले.

धोनीप्रमाणेच शिखर धवनही भारतीय कसोटी संघात नाही. तो ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिका खेळल्यानंतर विश्रांतीच घेत आहे. धवनही सध्या सुरू असलेल्या रणजीमध्ये खेळत नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी – मुंबईकर रोहित शर्मा, आर अश्विन पर्थ कसोटीला मुकणार

गेल्यावर्षी आयपीएलमध्ये १२ कोटी मिळालेल्या स्टार खेळाडूला केवळ दीड कोटीच मिळणार?

आजपर्यंतची विराट कोहलीची एवढी मोठी चूक कुणीच दाखवून दिली नव्हती