श्रीलंका दौऱ्यात धोनीची फलंदाजीची सरासरी न मोजता येणारी !

सध्या संपलेल्या श्रीलंका दौऱ्यात भारताच्या आजी-माजी कर्णधारांसह सर्वच भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. या मालिकेत टी२० मालिकेत ८२ धावा तर वनडेमध्ये ३३० धावा केल्या आहेत. याबरोबर या दोनही मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला तर कसोटीमध्ये ३५८ धावांसह शिखर धवन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

परंतु या मालिकेत धोनीच्या नावावर एक विशेष विक्रम जमा झाला. वनडे मालिकेत ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात धोनीला फलंदाजी मिळाली. या तीनही सामन्यात तो नाबाद राहिला. त्यानंतर काल झालेल्या सामन्यातही तो नाबाद राहिला. म्हणजे ज्या सामन्यात धोनीला फलंदाजी मिळाली त्या सामन्यात तो नाबाद राहिला.

धोनीने वनडे मालिकेत ४ सामन्यात १६२ तर एकमेव टी२० सामन्यात नाबाद १ धाव केली. नाबाद राहिल्यामुळे धोनीची सरासरी मोजता आला नाही. त्यामुळे ह्या संपूर्ण दौऱ्यातील धोनीचे सरासरी ही ∞ राहिली आहे.

विशेष म्हणजे धोनीने या दौऱ्यात फलंदाजीबरोबर यष्टीपाठीमागे ५ झेल आणि ४ फलंदाजांना यष्टिचित केले आहे.

कशी मोजली जाते क्रिकेटमध्ये फलंदाजाची सरासरी ?
फलंदाजाने केलेल्या धावांना त्याने खेळलेल्या डावांनी भागून येणारी संख्या ही सरासरी असते परंतु असे करताना यात नाबाद डाव मोजले जात नाही.