एमएस धोनीने हा विक्रम करत द्रविडला टाकले मागे आता फक्त सचिन तेंडुलकर आहे पुढे

दुबई। रविवारी 23 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात एशिया कप 2018 मधील सुपर फोरचा सामना पार पडला. हा सामना भारताने 9 विकेट्सने सहज जिंकला.

हा सामना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा भारतासाठी खेळलेला 505 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे तो आता भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू बनला आहे.

हा पराक्रम करताना धोनीने माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या भारताकडून खेळलेल्या 504 आंतराष्ट्रीय सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.

धोनीने आत्तापर्यंत 508 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील 3 सामने तो एशिया एकादश संघाकडून खेळला आहे. तर 505 सामने भारताकडून खेळला आहे.

त्याचबरोबर धोनीने काही महिन्यांपूर्वीच 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा भारतीय तर एकूण नववा क्रिकेटपटू होण्याचा विक्रम केला होता.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे क्रिकेटपटू-

664 सामने – सचिन तेंडुलकर

505 सामने – एमएस धोनी

504 सामने – राहुल द्रविड

433 सामने – मोहम्मद अझरुद्दीन

421 सामने – सौरव गांगुली

महत्वाच्या बातम्या –

तेंडुलकर-सेहवाग जोडीपेक्षा रोहित-शिखरची जोडी ठरली बेस्ट

टॉप ५: रोहित शर्माने शतकी खेळी करत घातली खास विक्रमांना गवसणी

एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव