धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!

पुणे। काल पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली डेयरडेविल्स सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने अर्धशतक करताना एक खास विक्रम रचला आहे.

धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करताना गौतम गंभीरला मागे टाकले आहे. धोनीने आता आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 3556 धावा केल्या आहेत.

याआधी हा विक्रम गंभीरच्या नावावर होता. त्याने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 3518 धावा केल्या आहेत. या यादीत 3333 धावांसह विराट कोहली विराजमान आहे. 

धोनीने काल 22 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. हे त्याचे यावर्षीच्या आयपीएल मोसमातील तिसरे अर्धशतक आहे. तर एकूण 20वे  अर्धशतक आहे.

तसेच तो यावर्षीच्या आयपीएल मोसमात 8 सामन्यात 286 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सध्या पाचव्या स्थानावर आहे.

कालचा सामना चेन्नईने 13 धावांनी जिंकला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार:

एमएस धोनी-  3556 धावा

गौतम गंभीर – 3518 धावा

विराट कोहली – 3333 धावा

रोहित शर्मा – 2198 धावा

महत्त्वाच्या बातम्या –

मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल

म्हणून किदांबी श्रीकांतला सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्रोल केले

हॉकी: हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या तर सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

दादाच्या बॅटची काळजी घ्यायचा सचिन

पुण्यात चेन्नईचा बोलबाला, विजयाची शंभरी पार करणारा दुसराच संघ