पुण्यातही धोनी धोनी असाच गजर !!!

पुणे | येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडला ६ विकेटने पराभूत केले. मुंबईत जेव्हा भारताने न्यूझीलंड विरुध्द या मालिकेतील पहिला सामना खेळला होता त्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा मुंबईकरांनी उभे राहून टाळया वाजवून भारताच्या या विक्रमवीर माजी कर्णधाराचे स्वागत केले होते, असेच काहीसे कालही पुण्यात झाले.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची लोकप्रियता संपूर्ण भारतात पसरलेली आहे. पुणे ही त्याला अपवाद नाही. पुण्यातही रांचीच्या या महान खेळाडूला भरपूर प्रतिसाद मिळाला.

२०१५ मध्ये जेव्हा आयपीएल मॅचफिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपाखाली चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्स या दोन संघांना निलंबित करण्यात आले. तेव्हा आयपीएलमध्ये दोन नवीन संघाचा उदय झाला. एक म्हणजे पुणे सुपर जायंट्स आणि दुसरा विजय गुजरात लायन्स.

त्यातील पुण्याच्या संघाचे नेतृत्त्व २०१५च्या मोसमात धोनीने केले होते. त्या मोसमात महेंद्रसिंह धोनीला पुण्याच्या संघाला सेमी फायनलपर्यंत नेता आले नव्हते, पण पुण्याच्या चाहत्यांमध्ये धोनीबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती. पुढील वर्षी महेंद्रसिंह धोनीला पुण्याच्या संघाच्या कर्णधार पदावरून काढले पण सांगतात तेव्हाही सर्वाधिक लोकप्रियता ही महेंद्रसिंह धोनीचीच होती.

View this post on Instagram

Dhoni Dhoni….!!! #indvnz #pune #gahunje #mca

A post shared by sharad Bodage (@sherrybodage) on

कालच्या सामन्यात न्यूझीलंडने केलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना भारत २०४ धावांवर ४ बाद असे सुस्थितीत होते. तेव्हा भारतात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. महेंद्रसिंह धोनीला मैदानात पाहून संपूर्ण चाहत्यांनी जोरदार जयघोष केला आणि त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले. सगळे चाहते जोरजोरात धोनी धोनी असा जल्लोष करत होते. त्यानंतर धोनीनेही चाहत्यांना निराश न करत भारताला सामना जिंकून दिला. धोनीने २१ चेंडूत १८ धावा केल्या. ज्यात धोनीने तीन चौकार लगावले. कालच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने २५ धावा देऊन ३ विकेट्स मिळवल्या.