Video: ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ पुन्हा एकदा उपयोगी

धरमशाला। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीचे पुन्हा एकदा अचूक रिव्ह्यू घेण्याचे कौशल्य दिसून आले.

या सामन्यात भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत होती. ३२.५ षटकात भारताची धावसंख्या ८ बाद ८७ धावा असताना धोनी आणि जसप्रीत बुमराह खेळत होते. त्यावेळी सचित पथीरानाच्या गोलंदाजीवर बुमराहला पायचीत बाद देण्यात आले होते. त्याचवेळी क्षणाचाही विलंब न करता धोनीने बुमराहासाठी डीआरएसची मागणी केली.

या रिव्ह्यूमध्ये चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असल्याचे दिसून आल्याने बुमराहला नाबाद देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीचे हे अचूक रिव्ह्यू घेण्याचे कौशल्य महत्वाचे ठरले.

या सामन्यात धोनीने अर्धशतक करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. धोनीने या सामन्यात ६५ धाव केल्या आहेत. तर भारताने सर्वबाद ११२ धावा केल्या होत्या. परानरू भारतीय संघ तरीही ७ विकेट्सने पराभूत झाला.