धोनीला आचार भंग केल्याबदल सक्त ताकीद…!!

६ तारखेला झालेल्या पुणे आणि मुंबई विरुद्धच्या सामान्यमध्ये इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर खेळताना पोलार्डच्या पॅडला बॉल लागला आणि धोनीने अपील केले. पंच एस. रवी यांनी पोलार्डला बाद दिले नाही,  धोनीला विश्वास होता म्हणून तो चिडला आणि मिश्कीलपणे डीआरएसची खुण केली.

सामना पुढे चालू ठेवण्यात पण सामना झाल्या नंतर रेफ्री मन्नू नायरकडून धोनीला कळवण्यात आले की त्याने खेळाच्या आचारांचा भंग केला आहे. धोनीला यामुळे मन्नू नायर यांनी सक्त ताकीद दिली आहे. सामना तसा पुण्याने ७ गडी राखून जिंकला पण ही एक विवादास्पद गोष्ट घडली.