धोनी करणार दुबईमध्ये क्रिकेट अकादमी सुरु !

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुबईच्या पॅसिफिक स्पोर्ट्स क्लब मध्ये स्वतःच्या नावाची क्रिकेट अकादमी सुरु करणार आहे, अशी त्याने माहिती दिली. भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, धोनी एकदिवसीय सामन्यांसाठी लवकरच संघात सामील होईल.

“क्रीडा क्षेत्राला आता जगभरात लाइम लाईट दिली जात आहे फक्त खेळ वाढवण्यासाठी नाही तर त्यामधील छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांसाठी सुद्धा. मला या क्लबचा एक भाग म्हणून आनंद झालेला आहे आणि ते यशस्वी होण्यासाठी मी शक्यते योगदान देईन,”. असे धोनी म्हणाला.

धोनी आता युवराज सिंग, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या अन्य भारतीय स्टारच्या यादीत सहभागी होणार आहे ज्यांच्या नवे आधीपासूनच क्रिकेट अकादमी आहे.

पॅसिफिक वेंचर्सच्या परवेझ खान यांनी घोषित केले की अकादमीचे नाव ‘एमएस धोनी क्रिकेट अकादमी’ असे असेल.

“क्रिकेटच्या क्षेत्रात सुपरस्टार असलेल्या एमएस धोनीशी त्याच्याकराराबद्दल पॅसिफिक स्पोर्ट्स क्लब उत्सुक आहे. केवळ यूएईमध्ये नाही तर इतर जीसीसी देश, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन या देशांमध्ये पीएससीकडे एमएस धोनी क्रिकेट अकादमी (एमएसडीसीए) चे सर्व अधिकार असतील. धोनी अकादमीचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल आणि वारंवार पीएससीला भेटही देईल,”असे खान म्हणाले.

काल म्हणजेच भारताच्या ७०व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने पॅसिफिक स्पोर्ट्स क्लबने ही घोषणा केली.