शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप

सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीच्या (सीओए) सदस्या डायना एडलजी यांनी बीसीसीआयवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये त्यांनी मागील वर्षी अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पद सोडल्याचे प्रकरण परत उकरून काढले आहे.

रवी शास्त्री यांना भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनवण्यासाठी बीसीसीआयने नियम मोडल्याचा आरोप एडलजी यांनी केला आहे. यामध्ये त्यांनी कर्णधार विराट कोहली हा सतत बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष राहुल जोहरी यांचा संपर्कात होता. त्यानेच कुंबळे यांना काढावे असा दबाव आणला होता, असेही म्हटले आहे.

2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कुंबळे यांचा प्रशिक्षक पदाचा करार होता. मात्र भारतीय संघ इंग्लंमध्ये पोहचला असता बीसीसीआयने मे महिन्यातच या पदासाठी नवीन प्रशिक्षकाच्या जाहिराती काढल्या होत्या

कुंबळे यांना सहा अर्जदारांमधून क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) निवडले होते. या समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश होता.

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रमेश पोवार यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी कायम ठेवावे हे एडलजी यांचे म्हणणे सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी नाकारल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एडलजी यांनी जसे विराटचे म्हणणे ऐकले तसेच भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्म्रिती मानधना यांच्या ईमेलचा विचार करावा, असे सुचविले आहे.

“कोहली आणि कुंबळे मध्ये फरक आहे. मात्र कुंबळे यांनी माघार घेतली”, असे सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी एडलजी यांना प्रत्युत्तर दिले.

महत्त्वाच्या बातम्या:

१८ वर्षीय गोलंदाजाचा कूच बिहार ट्रॉफीत अनोखा पराक्रम

भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

मोठी बातमी- २०१९आयपीएल लिलावासाठी अंतिम खेळाडूंची निवड जाहीर

दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी पृथ्वी शाॅच्या सहभागाबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी