तर धोनीला होऊ शकते शिक्षा, काय सांगतो आयसीसीचा नियम ? वाचा ?

धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीचे पुन्हा एकदा अचूक रिव्ह्यू घेण्याचे कौशल्य दिसून आले.

या सामन्यात भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत होती. ३२.५ षटकात भारताची धावसंख्या ८ बाद ८७ धावा असताना धोनी आणि जसप्रीत बुमराह खेळत होते. त्यावेळी सचित पथीरानाच्या गोलंदाजीवर बुमराहला पायचीत बाद देण्यात आले होते. त्याचवेळी क्षणाचाही विलंब न करता धोनीने बुमराहासाठी डीआरएसची मागणी केली.

या रिव्ह्यूमध्ये चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असल्याचे दिसून आल्याने बुमराहला नाबाद देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीचे हे अचूक रिव्ह्यू घेण्याचे कौशल्य महत्वाचे ठरले.

या सामन्यात धोनीने अर्धशतक करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. धोनीने या सामन्यात ६५ धाव केल्या आहेत. तर भारताने सर्वबाद ११२ धावा केल्या होत्या. परानरू भारतीय संघ तरीही ७ विकेट्सने पराभूत झाला.

धोनीने चतुराई दाखवताना पंचांनी जेव्हा बुमराहला बाद देण्यासाठी हात वर केला अगदी तेव्हाच रिव्ह्यू घेतला. नियमांप्रमाणे हा रिव्ह्यू फलंदाजी करत असलेल्या बुमराहने घेणे अपेक्षित होते.

यासाठी सोशल मीडियावर धोनीचे जोरदार कौतुकही करण्यात आले. परंतु आता दुसराच मुद्दा पुढे आला आहे. तो म्हणजे धोनीकडून नियम भंग झाला आहे का?

आयसीसीच्या नियमाप्रमाणे डीआयएस केवळ फलंदाजी करणाऱ्या संघात जो खेळाडू फलंदाजी करत आहे किंवा ज्याला बाद करण्यात आले आहे तोच घेऊ शकतो.
त्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या धोनीने ही मागणी केली कशी आणि ती केली असताना पंचांनी ती मान्य केली कशी? असे प्रश्न आता उभे राहिले आहेत. जर धोनीने डीआरएसचा नियम मोडला असेल तर त्याला याबद्दल काय दंड होते हे लवकरच समजणार आहे. 

काय आहे नियम?
सेक्शन ३ नुसार

३.१ या परिस्थितीत खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकतो-
३.१.३- जेव्हा एखाद्या फलंदाजाला बाद दिले जाते तेव्हा तो स्वतः खेळाडू किंवा मैदानावर असलेला संघाचा कर्णधार रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेऊ शकतो.

इंग्लिश भाषेत-
3.1 Circumstances in which a Player Review may be requested
3.1.3 Only the batsman involved in a dismissal may request a Player Review of an Out decision and only the captain (or acting captain) of the fielding team may request a Player Review of a Not out decision.