एकाच देशाचे दोन खेळाडू करत आहेत भारत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व

जेसन संघा हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. हा १८ वर्षीय खेळाडू भारतीय वंशाचा असून तो भारतीय वंशाचा पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार बनला आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबईकर प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉ भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

त्याचे वडील कुलदीप हे पंजाबमधील लोधीपुर या गावचे असून १९२०मध्ये त्याची आई सिल्वासाचे आजोबा राम सिंग शेती करण्यासाठी गेले होते. तर वडील कुलदीप १९८०साली ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले.

त्याची आई सिल्वासा त्याच्य आजपर्यंत झालेल्या बऱ्याच सामन्यांना हजर होत्या. जेसन संघाचे पूर्ण नाव हे जेसन जरकिरत सिंग संघा असे असून तो नेतृत्व करत असलेल्या संघात ऑस्ट्रेलियामधील अनेक दिग्गजांच्या मुलांचा समावेश आहे. असे असले तरी प्रतिभावान जेसनकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

१६ वर्षांपासून तो ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील संघात असून गेल्यावेळी झालेल्या विश्वचषकातही तो खेळला होता. त्याने यापूर्वी केलेल्या क्रिकेटमधील विक्रमांबद्दल स्वतः माजी दिग्गज कर्णधार स्टिव्ह वॉनेही कौतुक केले आहे.

आज मात्र त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही आणि २४ चेंडूत १३ धावांवर बाद झाला आहे.