धोनीसारख्या असामान्य खेळाडूसाठी जागा गमावण्यात दु:ख कसले?- दिनेश कार्तिक

बेंगलोर | भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक 2010 नंतर पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात पुनरागमन करतोय. नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहला झालेल्या दुखापतीमुळे कार्तिकला अफगानिस्तान विरूद्ध गुरूवार दि. 14 जूनपासून सुरू होत असलेल्या एकमेव कसोटीसाठी संधी मिळाली आहे.

याच पार्श्वभूमीवर कार्तिकने पत्रकारांशी बातचीत केली. तो म्हणाला, “भारतीय संघातील माझी जागा मी माझ्या खराब कामगिरीमुळे गमावली. पण याचे मला दु:ख नाही. उलट धोनीसारख्या पुढे जाऊन जागातील उत्कृष्ट कर्णधार बनलेल्या खेळाडूसाठी मी माझी जागा गमावली याचाचं मला आनंद आहे.”

“भारतीय संघात पुन्हा जागा मिळवण्याची आशा सोडून देणं सोपे होते. पण मी आशा सोडली नाही. तामिळनाडू संघाकडून मी देशांर्तगत क्रिकेट खेळत राहिलो. कसोटी सामने खेळने प्रत्येक खेळाडूसाठी एक मोठे आव्हान असते.”

“मला मिळालेल्या ह्या संधीचा मी पूरेपूर उपयोग करून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे.”

2004 साली कार्तिकने मुंबई येथे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर खराब कामगिरीमुळे त्याला संघातील आपले स्थान गमवावे लागले होते.

दिनेश कार्तिकने 23 कसोटी सामन्यात 27.77 सरासरीने 1000 धावा केल्या आहेत. तर यष्टीमागे 51 झेल व 5 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

भारतीय संघाबाहेर असताना त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करत 157 सामन्यात 42.07 सरासरीने 9214 धावा करत यष्टीमागे 377 झेल व  42फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?

भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!