‘निवड समितीचा दुजाभाव’ हरभजन सिंगची टीका

बीसीसीआय निवड समितीने नुकतेच काही दिवसांपूर्वी 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या एशिया कपसाठी भारताचा 16 जणांचा संघ जाहिर केला आहे. परंतू या संघात कर्नाटकच्या मयंक अगरवालला संधी न मिळाल्याने भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आश्चर्य व्यक्त केले आहे.

या भारतीय संघात खलिल अहमद या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त फारसा मोठा बदल संघात झालेला नाही. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या मंयककडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे हरभजनने टीका केली आहे.

याबद्दल हरभजनने ट्विटरवर आपली मते व्यक्त केली आहेत. त्याने ट्विट करताना एशिया कपसाठी निवड झालेल्या भारताच्या खेळाडूंची नावे असलेला फोटो शेअर केला आहे.

तसेच त्याला कॅप्शन देताना म्हटले आहे की “मयंक अगरवाल कुठे आहे? खूप धावा केल्यानंतरही मला तो संघात दिसत नाही. मला वाटते, वेगळ्या लोकांसाठी वेगळे नियम आहेत.”

मयंक मागील काही सामन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. 2017-18 च्या रणजी ट्रॉफी मोसमातही तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या मोसमात 13 डावात 105.45 च्या सरासरीने 1160 धावा केल्या होत्या.
त्यानंतर याच मोसमात त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने 8 डावात 723 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याची यावर्षी जून जुलै महिन्यात भारतीय संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यातही निवड झाली होती.

 

यात त्याने तीन शतके आणि एक अर्धशतकासह 8 सामन्यात 56.77 च्या सरासरीने 511 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या चौरंगी मालिकेतही भारत ब संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.

त्याची ही कामगिरी पाहता त्याची भारतीय संघातील निवड जवळ जवळ नक्की मानली जात होती, परंतू त्याला भारताच्या संघात संधी देण्यात आलेली नाही.

तसेच या एशिया कपसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताचे नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहित शर्मा करेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत विरुद्ध विंडिज संघात लखनऊमध्ये होणारा टी20 सामना या कारणामुळे ठरणार खास

रोहित शर्माने विराट कोहलीला केले सोशल मिडियावर अनफॉलो; चाहत्यांची वाढली चिंता

…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप