चार वर्षांपासून एकही वनडे न खेळलेला क्रिकेटपटू करणार विश्वचषकामध्ये श्रीलंकेचे नेतृत्व

बुधवारी(17 एप्रिल) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिमुथ करुनारत्नेककडे श्रीलंकेच्या वनडे संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवली आहे. त्यामुळे तो 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकातही श्रीलंकेचे नेतृत्व करणार आहे.

विशेष म्हणजे करुणारत्नेने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे चार वर्षांपूर्वी 2015 च्या विश्वचषकात खेळला आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत फक्त 17 वनडे सामने खेळले असून 15.83 च्या सरासरीने 190 धावा केल्या आहेत. मात्र तरीही श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर वनडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवत विश्वास दाखवला आहे.

करुणारत्ने हा श्रीलंकेच्या कसोटी संघाचाही कर्णधार आहे. त्याची कसोटीमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. पण वनडेतील त्याला फारसा अनुभव नाही. तसेच श्रीलंकेचा संघ सध्या संघर्ष करताना दिसून येत आहे. मागील दोन वर्षात एँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, लसिथ मलिंगा आणि थिसरा परेरा अशा खेळाडूंनी श्रीलंकेचे नेतृत्व केले आहे.

श्रीलंकेला काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अनुभवी फिरकी गोलंदाज लसिथ मलिंगाने श्रीलंकेचे मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकेत नेतृत्व केले होते. पण त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला वनडेत 0-5 आणि टी20मध्ये 0-2 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला होता.

परंतू याच दौऱ्यात करुणारत्नेने पहिल्यांदाच श्रीलंकेच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना दक्षिण आफ्रिकेला 2-0 असा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे त्याचे हे कसोटीच्या नेतृत्वातील यश वनडेमध्येही कायम राहिल अशी आपेक्षा सर्वांना असेल.

श्रीलंकेने जरी नवीन वनडे कर्णधाराची नियुक्ती केली असली तरी अजून 2019 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केलेला नाही. 23 एप्रिल ही 2019 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर करण्याची अंतिम तारिख आहे. आत्तापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, भारत, बांगलादेश आणि इंग्लंड या संघांनी 15 जणांचे संघ जाहीर केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत चौथ्यांदाच घडली अशी गोष्ट

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळाल्याने या खेळाडूला आवरता आले नाही अश्रू, पहा व्हिडिओ

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळालेल्या रायडू, पंतसाठी ही आहे आनंदाची बातमी