कार्तिकने आश्विनला दिले आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाचे नाव

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून एजबॅस्टन मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 287 धावा केल्या आहेत.

या डावात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तो गोलंदाजी करताना भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक सतत अश्विनला यष्टीमागुन तमिळ भाषेत सुचना देत प्रोत्साहन देत होता.

या दरम्यान तो अश्विनला ‘अॅशले’ या टोपननावाने बोलत होता. कार्तिक अश्विनला रणजी स्पर्धेदरम्यानही अॅशले या टोपननावाने बोलवतो. विषेश म्हणजे अॅशले मॅलेट या नावाचे आॅस्ट्रेलियाचे माजी फिरकी गोलंदाज आहेत. तसेच अश्विन आणि अॅशले मॅलेटच्या गोलंदाजीची शैली ही राइट आर्म आॅफ ब्रेक आहे.

अॅशले मॅलेट हे आॅस्ट्रेलियाकडून 1968 ते 1980 च्या दरम्यान खेळले आहेत. त्यांनी 38 कसोटी सामने खेळले असून यात 29.84 च्या सरासरीने 132 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्यांनी 9 वनडे सामनेही खेळले आहेत. यात 31 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज

पहिली कसोटी: इंग्लंडने दिले भारताला पहिल्या डावाच्या सुरुवातीलाच जोरदार धक्के

तीन दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू इम्रान खानच्या शपथ विधीला लावणार हजेरी