लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर

विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट इंडिजमधील मैदानांची नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे.

या सामन्यात खेळणाऱ्या ८ खेळाडूंची नावे आता जाहीर झाली आहे. त्यात २ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू या सामन्यात विश्व एकादशकडून खेळतील. आज याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

यापुर्वीच शाकिब उल हसन, राशिद खान आणि तमिम इक्बाल या खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यासाठी होकार दिला आहे. तसेच शाहिद आफ्रिदीबरोबर शोएब मलिक आणि थिसारा परेरा विश्व एकादश (वर्ल्ड ११) संघाकडून या सामन्यात खेळणार आहेत.

या संघाच नेतृत्व इंग्लंडचा वनडे कर्णधार इयान माॅर्गन करणार आहे. 

विश्व एकादश (वर्ल्ड ११) हे खेळाडू खेळणार-

इयान माॅर्गन( कर्णधार ), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, शाकिब उल हसन, राशिद खान, तमिम इक्बाल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, थिसारा परेरा

विंडीजचा संघ: कार्लोस ब्रेथवेट ( कर्णधार ), रयाद इम्रित, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, इविन लेविस, अॅश्ले नर्स, किमो पॉल, दिनेश रामदीन, रोवमन पोवेल, आंद्रे रसेल, सॅमुअल बद्री, मार्लोन सॅमुअल्स, केसरिक, विलीयम्स

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी, तु माझा देव आहेस!

रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप

आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त

दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले

हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच!