सामन्याआधी केलेला दिनेश कार्तिकचा ट्विट का होतोय व्हायरल

कोलंबो। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद निश्चित केले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली.

या सामन्यात मालिकेत संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकचे संधीचे सोने करताना भारतीय चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील अशी खेळी केली. ८ चेंडूत २९ धावांची बरसात करताना त्याने २ चौकार आणि ३ षटकार खेचले. 

या सामन्यापुर्वी कार्तिकने एक ट्विट केला होता. त्यात त्याने ‘हा या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही याचा शेवट अनोख्या पद्धतीने करु’ असे म्हटले होते. 

त्याने जे सामन्यापुर्वी म्हटले ते काल करुन दाखवले. त्यामुळे त्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे जेव्हा भारतीय संघ पहिला टी२० सामना जिंकला होता तेव्हाही कार्तिक संघाचा भाग होता आणि संघाच्या विजयात त्याने तेव्हा महत्वपुर्ण कामगिरी केली होती.