हटके मुलाखत पहायचीयं? दिनेश कार्तिकने आंद्रे रसेल घेतलेली ही मुलाखत पहाचं

काल झालेल्या सामन्यात  कोलकाता नाइट राइडर्सने दिल्ली डेयरडेविल्सचा 71 धांवानी पराभव केला होता.  या  विजयानंतर कोलकाता नाइट राइडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक मैदानात विजयाचा हिरो असलेला आंद्रे रसेलची मुलाखत घेताना दिसुन आला.

कार्तिकने मजेशीरपणे रसेलला त्याच्या डायटविषयी प्रश्न विचारले व रसेलने तेवढ्याच मजेशीरपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली.  मुलाखतीमध्ये आंद्रे रसेलने त्याचा सहकारी नीतीश राणाची देखील प्रशंसा केली.

कार्तिकने रसेलला त्याच्या हिटिंग पावर व लांब लांब छक्के मारण्याविषयी विचारले असता रसेल म्हणाला की, हा सर्व जमैकाच्या खास फळांचा परिणाम आहे.  जमैकामध्ये खास प्रकारची केळी भेटतात, कदाचित त्याचा देखील परिणास असू शकतो.

रसेलने ह्या आयपीएलमध्ये त्याची पहिली विकेट घेतली. आधीच्या सामन्यात तो एकही विकेट घेऊ शकला नव्हता. ह्या विषयी  बोलताना रसेल हसत हसत म्हणाला की, कार्तिक आता विकेट घेतली नाही म्हणुन मला बाहेर बसवणार नाही.  दोन पराभवानंतर मिळालेल्या विजयाने मी खुश आहे.

सामनावीर नीतीश राणाविषयी रसेल म्हणाला की, तो एक प्रतिभावान युवा खेळाडू आहे. त्याचे भविष्य उज्जवल आहे. राणाकडे मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे व तो एक मेहनती खेळाडू आहे.  दिनेश कार्तिक देखील रसेलच्या म्हण्याला दुजोरा देत म्हणाला की, नीतीश राणा चांगला खेळाडू आहे व तो कोलकाता नाइट राइडर्ससाठी महत्वाची खेळी खेळत आहे.