शेवटच्या ६ टी२० सामन्यात तो बाद झालाच नाही!

कोलकाता नाईट रायडर्सने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणाने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

तसेच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत असलेल्या दिनेश कार्तिकनेही चांगली कामगिरी करताना नाबाद ३५ धावा केल्या. 

श्रीलंका दौऱ्यावर तिरंगी टी२० मालिकेसाठी निवड झालेला हा खेळाडू गेल्या ६ टी२० सामन्यात बादच झाला नाही.

श्रीलंका दौऱ्यावर या खेळाडूने ५ सामन्यात सर्व सामन्यात नाबाद खेळी करताना १३, २, ३९, २, २९ धावा केल्या तर कालच्या सामन्यात नाबाद ३५ धावा केल्या. 

यामुळे त्याची गेल्या ६ सामन्यातील सरासरी तब्बल १२०ची आहे. विशेष म्हणजे त्याने  तिरंगी टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला होता.