दिनेश कार्तिकच्या धमाकेदार खेळीचे असे केले त्याच्या पत्नीने कौतुक!

काल भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे भारतीय संघाने बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचे आणि कार्तिकने केलेल्या खेळीचे अनेकांनी कौतुक केले.

पण या सगळ्यात कार्तिकचे विशेष कौतुक केले ते त्याची पत्नी आणि भारताची स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकलने. तिने कार्तिकाचे कौतुक करताना तिला त्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

दीपिकाने कार्तिकचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेयर केला आहे आणि त्याला खाली कॅप्शन दिले आहे की ‘#Proudwife’.

#proudwife ❤️

A post shared by Dipika Pallikal Karthik (@dipikapallikal) on

काल कार्तिक भारताला विजयासाठी १२ चेंडूत ३४ धावांची गरज असताना फलंदाजीला आला आणि त्याने आक्रमक खेळत ३ षटकार आणि २ चौकारांसह ८ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.