सतत ट्विट करणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी काल पराभूत झाल्यावर फक्त ह्याच खेळाडूने केलाय ट्विट

केप टाउन । भारतीय संघ पुढच्या सामन्यात जोरदार कमबॅक करेल असा विश्वास व्यक्त केला आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने. त्याने ट्विटरच्या व्यक्त केला आहे.

भारतीय संघ गेले काही महिने सतत भारतात क्रिकेट खेळाला आहे. या काळात संघाने सतत विजय मिळवले आहे. त्यामुळे सामना संपल्यावर खेळाडू मोठ्या प्रमाणावर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असतं. परंतु पहिला कसोटी सामना सुरु झाल्यापासून याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. ५ जानेवारीपासून आजपर्यंत केवळ हार्दिक पंड्याने ट्विट केला आहे. अन्य सर्व खेळाडूंनी सुमार कामगिरीमुळे टीकेचे धनी होण्यापेक्षा सोशल माध्यमांपासून दूर राहायलाच प्राधान्य दिले.

कोणताही सामना झाल्यावर संघातील खेळाडू एखादा ट्विट करतात. परंतु हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू २-३ ट्विट करून भावना व्यक्त करतात. हे दोघेही त्यांचा खेळ कसा झाला. काय चुका झाल्या काय बरोबर घडले यावर ट्विट करतात.

आजही हार्दिकने असाच ट्विट केला आहे. ” तुम्ही पहिल्या कसोटी सामन्यात ज्या शुभेच्छा आणि पाठिंबा दिला त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आम्ही निराश आहोत की आम्ही चांगली कामगिरी करून पराभूत झालो. आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करू. ” असे पंड्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

हार्दिक पंड्याचा ट्विट: