राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती खेळाडू झाली आमदार

भारतीय माजी महिला थाळीफेकपटू कृष्णा पुनिया नुकत्याच झालेल्या राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आमदार झाली आहे. कॉंग्रेस या राजकिय पक्षाच्या बाजूने तिने सादुलपूरमधून निवडणुक लढवली.

या निवडणुकीत पुनियाला एकूण 70020 मते मिळाली. तिने बहुजन समाज पक्षाच्या मनोज न्यांगलीला 18084 मतांनी पराभूत केले.

पुनियाने 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. निवडणुक लढवण्याची ही तिची दुसरी वेळ आहे. याआधी 2013च्या निवडणुकीत पुनियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दोहामधील एशियन गेम्समध्ये पुनियाने कांस्य पदक जिंकले होते. तर 2012च्या लंडन ऑलिंपिकमध्ये ती सहाव्या स्थानावर होती.

“खेळाडू आणि अॅथलेटिक्ससाठी चांगला सोयीसुविधा उभारणे यावर माझे अधिक लक्ष असणार आहे”, असे पुनिया म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारणही आहे तसचं काहीस वेगळं

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या रोहित शर्मालाच युवराजने खडसावले

दुसऱ्या कसोटी सामन्यात हे खेळाडू टीम इंडियाकडून येणार सलामीला