जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा अजिंक्य, प्रकाश, अक्षय बलकवडेला सुवर्णपदक

पुणे । कै. स्वप्निल जयंत सोमण यांच्या जन्मस्मृतीदिनानिमित्त पुणे जिल्हा अमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अजिंक्य जोशी, प्रकाश साहू, अक्षय बलकवडे यांनी वरिष्ठ गटात सुवर्णपदक मिळवले. सोमणस् हेल्थ क्लबने सांघिक विजेतेपद पटकाविले.

सोमण्स हेल्थ क्लबतर्फे आयोजित ही स्पर्धा बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशालेत झाली. पुढील महिन्यात १ ते ३ जून दरम्यान सिंधुदुर्ग, कुडाळ येथे होणा-या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय पदक विजेते सागर सहस्त्रबुद्धे, अजिंक्य जोशी, प्रशिक्षक गिरीश गिंडी, राजेश जाधव, मोहनीश राजीवडे, राजहंस मेहंदळे यांच्या उपस्थितीत झाला. विजेत्या स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. तर विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली. अक्षया शेडगे ही स्ट्राँग वूमन तर ँप्रकाश साहू याने स्ट्रॉंग मॅन हा किताब पटकाविला.

निकाल – वरिष्ठ पुरुष-५९ किलो – अक्षय तरे (शिवदुर्ग) – ४५२.५ किलो, शेख (आझम) -३१५ किलो. ६६ किलो – अजिंक्य जोशी (सोमण्स हेल्थ क्लब) – ४४२.५ किलो. ७४ किलो – शरद पवार (सोमण्स हेल्थ क्लब) – ३९२ किलो, चेतन बावळे (फिशर) – ३७२.५ किलो, प्रसाद कोतवाल (फिशर) – ३६० किलो. ८३ किलो – प्रकाश साहू (पॉवर हाउस) -६०० किलो, रोहित डिंबळे (सोमण्स हेल्थ क्लब) – ५९७.५ किलो, रोहन तापकीर (सोमण्स हेल्थ क्लब) -५३७.५ किलो. ९३ किलो – गौरव घुले (सोमण्स हेल्थ क्लब) – ६४५ किलो, धीरज नाघे (सोमण्स हेल्थ क्लब) – ५२५ किलो अनिरुद्ध (सोमण्स हेल्थ क्लब) -५२० किलो. १२० किलो – अक्षय बलकवडे (सोमण्स हेल्थ क्लब) – ६३५ किलो. १२० किलोवरील – गणेश जगताप (सोमण्स हेल्थ क्लब) -५५५.

ज्युनिअर मुले -५३ किलो – प्रज्वल शेलार (इंद्रायणी) – ३०० किलो.५९ किलो – अक्षय तरे (शिवदुर्ग) – ४५२.५ किलो, विजय जगताप (पॉवर हाउस) – ३९० किलो, तेजस सहस्त्रबुद्धे (सोमण्स हेल्थ क्लब) – ३७५.५ किलो.६६ किलो – किरण थिटे (इंद्रायणी) – ४८७.५ किलो, शुभम जगताप (पॉवर हाउस) – ४२७.५ किलो, सिद्धेश काजलकर (पॉवर हाउस) – ४०५ किलो. ७४ किलो -ओंकार खेडकर (पॉवर हाउस) -५५७.५ किलो, तौफिक खान (पॉवर हाउस) -४१२.५ किलो, राज परदेशी (फिशर) -३६० किलो. ८३ किलो -अभिषेक मेहंदळे (सोमण्स हेल्थ क्लब) -४५७.५ किलो, यश भालेराव (सोमण्स हेल्थ क्लब) -४४७.५ किलो, रॉनी डीसूझा (फिशर) – ४१७.५ किलो.

९३ किलो -श्रीकांत पंत (सोमण्स हेल्थ क्लब) -५३५ किलो, नील लपालीकर (पॉवर हाउस) -५१७.५ किलो. १०५ किलो-प्रतीक पवार (पॉवर हाउस)-४१५ किलो. १२० किलोवरील – प्रथमेश सकळे (पॉवर हाउस) – ४६० किलो.