पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डिव्हाईन स्टार्स, मेटा स्कुल संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

पुणे: डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित हिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डिव्हाईन स्टार्स, मेटा स्कुल या संघांनी सलग दुसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

धायरी येथील स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आदिती गायकवाडच्या नाबाद 67 धावांसह श्रावणी कदम(4-5)च्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने रिग्रीन संघाचा 8 गडी राखून पराभव करत दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

रिग्रीन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20षटकात 7बाद 120धावा केल्या. यात किरण नवगिरेने 50धावा, तेजल हसबनीसने 24धावा, श्रद्धा पाखरकरने नाबाद 22धावा केल्या. डिव्हाईन स्टार्सच्या श्रावणी कदमने 5धावांत 4गडी बाद करून रिग्रीन संघाला 120धावांवर रोखले.

डिव्हाईन स्टार्स संघाने हे आव्हान 16.3षटकात 2बाद121धावा करून पूर्ण केले. आदिती गायकवाडने 53 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 67धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.आदितीला  वैष्णवी रावलीयाने 27धावा व भारती फुलमाळीने 12धावा काढून सुरेख साथ दिली.सामन्याची मानकरी आदिती गायकवाड ठरली.

दुसऱ्या सामन्यात रोहिणी मोरे (नाबाद 68)हिने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मेटा स्कुल संघाने ट्रँटर संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मुक्ता मोगरे 50, अंकिता भोंगाडे 29, माधुरी आघाव 24, नेहा चावडा 22यांनी केलेल्या धावांच्या जोरावर ट्रँटर संघाने 20षटकात 6बाद 149धावा केल्या.

मेटा स्कुलच्या पूनम खेमनार(2-22), कल्याणी चावरकर(1-19), उत्कर्षा पवार(1-19), सोनाली शिंदे(1-30), इशा पठारे(1-24)यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. 149धावांचे आव्हान मेटा स्कुल संघाने 18.5षटकात 3गड्यांच्या बदल्यात 151धावा काढून पूर्ण केले.

यामध्ये रोहिणी मोरेने 52चेंडूत 8चौकार व 2षटकारांसह नाबाद 68काढून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. कल्याणी चावरकरने नाबाद 24धावा, पूनम खेमनारने 19धावा व उत्कर्षा पवारने 14धावा केल्या. सामनावीर हा ‘किताब रोहिणी मोरेने पटकावला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

रिग्रीन: 20षटकात 7बाद 120धावा(किरण नवगिरे 50(55,4×4), तेजल हसबनीस 24(16,4×4), श्रद्धा पाखरकर नाबाद 22(20,2×4), श्रावणी कदम 4-5)

पराभूत वि.

डिव्हाईन स्टार्स: 16.3षटकात 2बाद 121धावा(आदिती गायकवाड नाबाद 67(53,6×4), वैष्णवी रावलीया 27(32,3×4), भारती फुलमाळी 12(9), रोहिणी मोने 1-25);सामनावीर-आदिती गायकवाड;

ट्रँटर: 20षटकात 6बाद 149धावा(मुक्ता मोगरे 50(38,9×4), अंकिता भोंगाडे 29(31,3×4), माधुरी आघाव 24(18,2×4), नेहा चावडा 22(17,4×4), पूनम खेमनार 2-22,कल्याणी चावरकर 1-19, उत्कर्षा पवार 1-19, सोनाली शिंदे 1-30, इशा पठारे 1-24) पराभूत वि.मेटा स्कुल: 18.5षटकात 3बाद 151धावा(रोहिणी मोरे नाबाद68(52,8×4,2×6), कल्याणी चावरकर नाबाद 24(26,3×4), पूनम खेमनार 19(14,2×4,1×6), उत्कर्षा पवार 14(16), काजल निकाले 1-16, मुक्ता मोगरे 1-27, निसर्ग तेहवाडे 1-30);सामनावीर-रोहिणी मोरे.