माझी तुलना सचिन बरोबर कधीच करू नका -पृथ्वी शाॅ

कसोटी पदार्पणातच दमदार शतक ठोकणाऱ्या शतक ठोकणाऱ्या 18 वर्षीय पृथ्वी शाॅवर कौतूकाचा वर्षाव झाला आहे. काहींनी तर त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत केली आहे.

चाहते पृथ्वीची तुलना सचिन सोबत करत असले तरी पृथ्वीने काही वर्षींपुर्वीच आपण स्वत:ची तुलना सचिन सोबत कधीच करत नाही, असे त्याने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते.

“सचिनने 14 व्या वर्षी रणजी सामन्यात पदार्पण केले होते. मला तशी कामगिरी करता आलेली नाही. सचिन हा सर्वकालीन महान खेळाडू आहे. मला अजून खुप लांबचा टप्पा गाठायचा आहे.” असे पृथ्वीने आपल्या मुलाखतीत म्हटले होते.

विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शाॅने 154 चेंडूत 134 धावांची आक्रमक खेळी केली होती.  पृथ्वीने या खेळीत 19 चौकार मारले होते.

रणजी ट्राॅफी आणि दुलीप करंडक स्पर्धेत त्याने पदार्पणातच शतक ठोकण्याची किमया केली होती.

भारत आणि विंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 12 आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. पृथ्वीने या सामन्यात जर शतक ठोकले तर तो रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांच्या यादीत जाऊन बसणार आहे.

रोहित शर्मा आणि सौरव गांगुली या दिग्गजांनी पदार्पण केल्या नंतर पहिल्या दोन्ही सामन्यात शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. भारतीय संघाचा माजी महान कर्णधार मोहम्मद अझरुद्दिने पदार्पणाच्या पहिल्या तीन सामन्यात शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-