सृजन करंडक स्पर्धेत डॉल्फीन स्पोर्टस् क्लब(पीसीएमसी) संघाचा मोठा विजय

पुणे: पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत डॉल्फीन स्पोर्टस् क्लब(पीसीएमसी) संघाने किरणभाऊ युवा मंच संघ(वेल्हा) संघाचा तर निसर्ग क्रिकेट क्लब(दौंड)  संघाने डोनाल्ड क्रिकेट क्लब इंदापुर(भिगवन) संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
 
लेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दिलिप वर्माच्या एकाकी नाबाद 35 धावांच्या बळावर डॉल्फीन स्पोर्टस् क्लब(पीसीएमसी) संघाने किरणभाऊ युवा मंच संघ(वेल्हा) संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळाताना विशाल कांबळे, विक्रम कांबळे  व अमोल माने यांच्या अचूक गोलंदाजीने किरणभाऊ युवा मंच संघ(वेल्हा) संघाचा डाव 6 षटकात 6 बाद 39 धावांत रोखला. 39 धावांचे लक्ष दिलिप वर्माच्या नाबाद 35 धावांसह डॉल्फीन स्पोर्टस् क्लब(पीसीएमसी) संघाने एकही गडी न गमावता केवळ 3.3 षटकात 40 धावा करून सहज पुर्ण केले. नाबाद 35 धावा करणारा दिलिप वर्मा सामनावीर ठरला. 
 
दुस-या लढतीत रामदास राऊतच्या 39 धावांच्या जोरावर निसर्ग क्रिकेट क्लब(दौंड)  संघाने डोनाल्ड क्रिकेट क्लब इंदापुर(भिगवन) संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना डोनाल्ड क्रिकेट क्लब इंदापुर(भिगवन) संघाने 6 षटकात 4 बाद 54 धावा केल्या. 54 धावांचे लक्ष 
रामदास राऊतच्या 39  धावांसह निसर्ग क्रिकेट क्लब(दौंड) संघाने 4.5 षटकात 3 बाद 55 धावा करून पुर्ण केले. रामदास राऊत सामनावीर ठरला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी 
किरणभाऊ युवा मंच संघ(वेल्हा)- 6 षटकात 6 बाद 39 धावा(किरण वारकर 7, अरविंद केलसकर 7,विशाल कांबळे 2-2,विक्रम कांबळे 2-16, अमोल माने 2-13) पराभूत वि डॉल्फीन स्पोर्टस् क्लब(पीसीएमसी)- 3.3 षटकात 0 बाद 40 धावा(दिलिप वर्मा नाबाद 35) सामनावीर- दिलिप वर्मा
डॉल्फीन स्पोर्टस् क्लब(पीसीएमसी) संघाने 10 गडी राखून सामना जिंकला. 

डोनाल्ड क्रिकेट क्लब इंदापुर(भिगवन)- 6 षटकात 4 बाद 54 धावा(इजाज कुरेशी 28, किरण घाडगे 13, हजिमस्तान बेपारी 12, दिपक वालनवार 3-12, दिनेश वालनवार 1-17) पराभूत वि निसर्ग क्रिकेट क्लब(दौंड)- 4.5 षटकात 3 बाद 55 धावा(रामदास राऊत 39, दिपक वालनवार 9, किरण घाडगे 1-11) सामनावीर- रामदास राऊत
निसर्ग क्रिकेट क्लब(दौंड)  संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.