युवराज सिंग विरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग विरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल झाली आहे. युवराजच्या भावाची बायको आकांक्षा शर्माने ही केस दाखल केली आहे.

आकांक्षा शर्माने ही बिग बॉस १० मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

आकांक्षा शर्माचे वकील असणाऱ्या स्वाती शर्मा यांनी सांगितले की आकांशाचे पती जोरावर सिंग , सासू शबनम सिंग और युवराज सिंग यांच्याविरुद्ध ही केस दाखल करण्यात आली आहे. केसची पहिली तारीख २१ ऑक्टोबर आहे.

युवराजविरुद्ध केस दाखल का केली यावर आकांक्षाचे वकील स्वाती शर्मा म्हणाल्या, ” घरगुती हिंसा म्हणजे फक्त शारीरिक इजा किंवा हिंसा होत नाही. त्यात मानसिक छळाचाही समावेश होतो. युवराजवर ही गोष्ट लागू होते. जेव्हा आकांशावर हे अन्याय होत होते तेव्हा युवराज शांत बसला होता. “