या कारणामुळे रिषभ पंत म्हणतो, माझी धोनीबरोबर तुलना नको…

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने माजी कर्णधार एमएस बरोबर त्याची तुलना करु नका असे सांगितले आहे.

धोनीला नुकत्याच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याऐवजी पंतने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र यावेळी त्याने मोठ्या चूका केल्याने त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. तसेच त्याची मोठ्या प्रमाणात धोनीबरोबर तुलना करण्यात आली.

याबद्दल एएनआयशी बोलताना पंत म्हणाला, ‘मी तुलनेबद्दल खूप विचार करत नाही. एक खेळाडू म्हणून मला धोनीकडून खूप शिकायचे आहे. तो दिग्गज आहे. मला लोकांनी तुलना केलेली नको आहे पण मी ती गोष्ट थांबवू शकत नाही. मी त्याच्या खूप जवळ आहे आणि मी त्याच्याशी सर्व गोष्टीबद्दल चर्चा करतो. मी त्याच्याशी मैदानावर आणि मैदानाबाहेर माझ्या खेळात कशी सुधारणा करावी याबद्दलही बोलतो.’

त्याचबरोबर धोनी आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून खूप काही शिकायला मिळते असेही पंतने म्हटले आहे.

पंत म्हणाला, ‘मी धोनी आणि कोहलीकडून शिस्त, दबावाखाली कशी कामगिरी करायची, लोकांच्या चूकांमधून कसा बोध घ्यायचा आणि तूमच्या खेळावर त्याची अंमवबजावणी कशी करायची अशा अनेक गोष्टी शिकत आहे.’

तसेच इंग्लंड आणि वेल्समध्ये यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाबद्दल पंत म्हणाला, ‘मी विश्वचषकाबद्दल खूप विचार केलेला नाही. कारण आम्ही भारतात खेळत होतो. आणि इंग्लंडमध्ये परिस्थिती वेगळी असणार आहे. मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका झाली आणि आम्ही आता आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे आम्ही नियमित सामने खेळणार आहे. जेव्हा मी इंग्लंडला जाईल तेव्हा याचा विचार करेल.’

पंत यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध 24 मार्चला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून विजेतेपद मिळवण्यास रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आले अपयश, कोहलीने केले स्पष्ट

या दिवशी होणार आयपीएल २०१९ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित

टी20 मुंबई लीगमध्ये खेळताना दिसणार अर्जून तेंडुलकर?