मला कुणाला काही सिद्ध करुन दाखविण्याची गरज नाही- जडेजा

दुबई | काल (२१ सप्टेंबर) झालेल्या एशिया कप स्पर्धेतील सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशाचा पराभव केला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण  या तिन्ही क्षेत्रात भारताची कामगिरी वरचढ झाली.

तब्बल 480 दिवसांनी पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने दमदार कामगिरी करत 29 धावांत 4 बळी मिळवले. त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

“हे पुनरागमन माझ्या कायम लक्षात राहील कारण एवढ्या दिवस संघाबाहेर राहण्याची माझी पहिलीच वेळ आहे,” असे जडेजाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

“माझी क्षमता काय आहे. हे मला कुणालाही सिद्ध करून दाखवयाची आवश्यकता नाही तर त्याला धार देण्याची गरज आहे,” असेही तो  पत्रकारांना बोलताना म्हणाला.

अक्सर पटेलला दुखापत झाल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. विजय हजारे ट्रॉफीत खेळत असताना आपल्याला निवड समितीकडून बोलवण्यात आलेल्या संधीचा फायदा झाल्याचे त्याने सांगितले. इंग्लड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील त्याच्या कामगिरीवर  तो समाधानी असल्याचे त्याने सांगितले.

2019 विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळेल कि नाही याचा विचार आपण करत नसून या स्पर्धेतील सामन्यांवर लक्ष केंद्रीत करीत असल्याचे त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली

-२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम

-Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट