आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंड संघ १२ षटकांत १ बाद ११८ धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडचे सलामीवीर टीम सेफर्ट आणि काॅलीन मुन्रोने आज ७.४ षटकांत ८० धावांची जबरदस्त सलामी दिली.

यावेळी ही जोडी फोडण्यात चार भारतीय गोलंदाजांना अपयश आल्यानंतर अखेर कुलदीप यादवने टीम सेफर्ट यष्टीचीत करत ही भागीदारी मोडली.

परंतु या विकेटमध्ये कुलदीपपेक्षाही धोनीचीच चतुराई कामाला आली. धोनीने नेहमीप्रमाणेच चतुराई दाखवत विद्युत वेगाने टीम सेफर्टला यष्टीचीत केले. २५ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांसह त्याने ४३ धावा केल्या.

कुलदीपच्या कारकिर्दीतील ही १८वी यष्टीचीत विकेट होती. आणि यामधील बऱ्याच यष्टीचीत विकेट्समध्ये धोनीचीच भूमिका सर्वात महत्त्वाची राहिली आहे.

पहा व्हिडीओ- 

महत्त्वाच्या बातम्या- 

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा

धोनी जादू! हातात बॅटही न घेतलेल्या धोनीच्या नावावर तिसऱ्या टी२० सामन्यात विक्रमांचा विक्रम