पाकिस्तान बरोबर खेळण्यासाठी बीसीसीआयला भाग पडण्यास आयसीसी कमी पडते- वासिम अक्रम

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम आयसीसीवर टीका करताना म्हणाला की आयसीसी बीसीसीआयला पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भाग पाडण्यात कमी पडत आहे.

त्याचे असेही म्हणणे आहे की सध्याच्या भारत आणि पाकिस्तान मधील तरुण खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळायला मिळत नाही हे खूप दुर्दैवी आहे. खेळाला राजकारणापासून वेगळे ठेवले पाहिजे.

अक्रम जिओ टीव्हीशी बोलताना पुढे म्हणाला,” मला नाही वाटत आयसीसीकडे बीसीसीआयला भाग पाडण्याचे तितके सामर्थ्य आहे. पण बीसीसीआय आणि पीसीबी यांनीही एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. राजकारण आणि खेळ वेगवेगळे ठेवायला हवे”

त्याचबरोबर तो म्हणाला की भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट बघणे हे ऍशेस मालिकेपेक्षाही रोमांचक असते.