विश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही

रविवारी, 14 जूलैला लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड क्रिकेट संघाने 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि 44 वर्षांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पुर्ण केले.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या या नाट्यपूर्ण अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांनी या सामन्यात मारलेल्या बाऊंड्री फरकाने इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आले.

हा विजय मिळवल्यानंतरही इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने अंतिम सामन्याचा निकाल अशा प्रकारे लागणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

तो टाईम्सला सांगताना म्हणाला, ‘मला वाटत नाही की जिंकणे इतके सोपे आहे. जेव्हा दोन्ही संघात खूपच कमी अंतर असेल आणि तरीही अशा प्रकारे निकाल लागणे योग्य नाही. मला वाटत नाही की असा कोणता एक क्षण होता, जिथे आपण म्हणू शकतो सामन्यात फटका बसला. सामना बरोबरीचा झाला.’

मॉर्गन पुढे म्हणाला, ‘मी तिथे होतो आणि मला माहित आहे काय झाले. पण मी सांगू शकत नाही की कुठे सामना हरला आणि जिंकला. आम्ही नक्कीच पात्र होतो. हे सर्व खूप वेडेपणाचे होते. पराभव स्विकारणे आणखी अवघड आहे.’

त्याचबरोबर मॉर्गनने हे देखील सांगितले की त्याने मागील काही दिवसात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनशी चर्चा केली आहे.

मॉर्गन म्हणाला, ‘मी केनशी मागील काही दिवसात वेळवेगळे प्रसंगाबद्दल बोललो आहे. पण आम्ही दोघेही तर्कसंगत स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. कारण काहीवेळेस त्यांनी आमच्यावर वर्चस्व ठेवले आणि काहीवेळेस आम्ही त्यांच्यावर. माझ्याप्रमाणेच त्यालाही या विचारातून बाहेर पडणे शक्य नाही.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर

एमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य

या क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा