साराच्या फेक ट्विटर अकाउंटवर विश्वास ठेवू नका: सचिन 

मुंबई । माझी मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर ट्विटरवर नाहीत, त्यामुळे फेक ट्विटर अकाउंटवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारं ट्विट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या फेक ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सचिन तेंडुलकरला या प्रकाराची कल्पना दिली होती.

आता या प्रकरणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वतःचा ट्विटकरून अशा कोणत्याही फेक अकाउंटवर विश्वास ठेवू नये असे सांगितले आहे. 

यासाठी सचिनने फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. सचिन म्हणतो, ” माझी मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांच्या फेक ट्विटर अकाउंटवर विश्वास ठेवू नका. ते ट्विटरवर नाहीत. ” 

“मी ट्विटर इंडियाला अशी विनंती करतो की त्यांनी ही फेक अकाउंट लवकरात लवकर काढून टाकावीत. आमच्याबद्दल ह्या अकाउंटमुळे गोंधळ आणि गैरसमज निर्माण होत आहे. मी लवकरात लवकर योग्य त्या कार्यवाहीची अपेक्षा करत आहे. ” 

तत्पूर्वी ज्या फेक अकाउंटवरून हे ट्विट करण्यात आले होते ते अकाउंट आता डिलीट झाले आहे.