सायकलीस्ट डॉ. महाजन यांनी 11 दिवसात पूर्ण केले काश्मीर ते कन्याकुमारी अंतर… विश्वविक्रमाची होणार नोंद

नाशिक । नाशिककर सायकलीस्ट बंधूपैकी डॉ. महेंद्र महाजन यांनी एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली असून काश्मीर ते कन्याकुमारी हे 3850 किमीचे अंतर केवळ 10 दिवस 11 तासात पूर्ण केले. आज (दि. 15) गुरुवारी सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी ही माहीम पूर्ण झाली. गिनीज रेकॉर्डसाठी या मोहिमेस 12 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे या वेगवान सायकलिंगचा विक्रम करण्यासाठीच्या या ‘के टू के सायकलिंग चॅलेंज’ मोहिमेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, यूएमसीए रेकॉर्ड्स मध्ये याची निश्चितपणे नोंद होणार आहे.

महाजन बंधू फाउंडेशन आणि नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आणि जायंट स्टारकेन यांच्यातर्फे आयोजित या मोहिमेत ‘खेलो इंडिया’ आणि ‘तंबाखू बंद’ या उपक्रम तसेच तंबाखू बंद (Quit Tobacco) या अभियानाला समर्थन करण्यात आले. टूर ऑफ ड्रॅगन, रेस अॅक्रॉस अमेरिका त्यानंतर भारतात गोल्डन क्वाड्रीलेटरल मोहीम असे प्रत्येकवेळी वेगळे उपक्रम राबवून सायकलिंगचा प्रचार प्रसार आणि त्याद्वारे समाजोपयोगी उपक्रम लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम महाजन बंधू करत आहेत.

दोन नोव्हेंबर 2018 रोजी सुरु होणारी ही मोहीम खराब हवामान, काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि त्यामुळे श्रीनगर जम्मू महामार्गावर कोसळलेली दरड यामुळे तीन दिवस उशिरा 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 44 मिनिटांनी सुरु झाली. जम्मू काश्मीर मध्ये नोव्हेंबर महिन्यात गेल्या 18 वर्षातील सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद झाली.

सोमवारी (दि. 5) लाल चौक, श्रीनगर येथून सुरु झालेली ही मोहीम सुरु होणार पुढे श्रीनगर, उधमपूर, पठाणकोट, दशुआ, होशियारपूर, अंबाला, दिल्ली बायपास (पूर्व परिधीय महामार्ग), आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सागर, छिंदवाड, नागपूर, आदिलाबाद, कामारेड्डी, हैदराबाद, कुर्नूल, अनंतपुर, बंगळूरू, कृष्णागिरी, सेलम मदुराई, तिरुनेलवेली मार्गे कन्याकुमारी समुद्रकिनारा (विवेकानंद स्मारक) येथे मोहिमेचा समारोप करण्यात आला. कन्याकुमारी येथे डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमचे कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी प्रसाद वडनेरे यांनी तिरुवल्लुर पुतळ्याची प्रतिकृती भेट देत स्वागत केले.

काश्मीर मधील बर्फवृष्टी, 1 डिग्रीचे तपमान, पुढे पंजाब मध्ये 35 डिग्री तपमान, त्यानंतर दिल्लीतील थंडी आणि धुके, दक्षिणेत प्रवेश करताना नागपूर पासून 36 ते 40 डिग्री तपमान असे विविध वातावरणातून हा प्रवास पूर्ण करण्यात वेगळीच मजा आली अशी प्रतिक्रिया यावेळी डॉ. महाजन यांनी दिली.

या वेगवान सायकल प्रवासात भारताच्या जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या 12 राज्यातून प्रवास केला.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान डॉ. महाजन यांना प्रशिक्षक मितेन ठक्कर यांचे मार्गदर्शन लाभले. तर किशोर काळे, अॅड. कबीर राचुरे, अॅड. दत्ता चकोर, विजय काळे (हे सर्व 4 जण रॅममध्ये भाग घेण्यास पात्र आहेत), सागर बोन्दार्डे आणि संदीप परब, इतर एक असे एकूण सहा सदस्य क्रू मेम्बर्स म्हणून मोहिमेत सहभागी झाले.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया...

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

दिल्ली डेअरडेविल्सकडून तीन मोठ्या खेळाडूंना संघातून डच्चू