वाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी ?

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला आजकाल डीआरएस किंग म्हणून ओळखले जाते. काही वेळा तर डीआरएस पद्धतीला धोनी रेव्हिएव पद्धतही म्हटले जाते. परंतु हा खेळाडू या पद्धतीमध्ये देशाला किती वेळा यशस्वी माहित आहे का ?

डीआरएस पद्धत वापरताना यष्टीरक्षक हा नेहमीच महत्वाची जाबाबदारी पार पडतो. त्यामुळे भारतीय संघातही धोनी हाच त्यासाठी एक जबाबदार खेळाडू आहे. गोलंदाज हे गोलंदाजी करत असताना भावनिक होऊन बऱ्याच वेळा कर्णधाराकडे डीआरएस घेण्याचा तगादा लावतात. त्यावेळी यष्टिरकाकडे खरी जबाबदारी असते.

परंतु भारताचा हा दिग्गज खेळाडू या पद्धतीमध्ये कमालीचा यशस्वी झाला आहे. यावर्षी धोनीच्या उपस्थितीत ९ वेळा रेव्हिव घेण्यात आला आणि विशेष म्हणजे भारताला ७ वेळा त्यात यश आले. धोनी यावर्षी ७७.७८% वेळा यशस्वी झाला आहे.

२०११ साली धोनीच्या उपस्थितीत भारताने १४वेळा रेव्हिव घेतले. त्यात भारताला केवळ ३वेळा यश मिळाले तर २ वेळा मैदानावरील पंचांचा कॉल असा निर्णय लागला. २०१३-२०१५ या काळात भारतीय संघाने केवळ आयसीसीच्या स्पर्धांत डीआरएस पद्धत अनुभवली. त्यात धोनी संघात असताना भारताने ५ वेळा रेव्हिव घेतला. त्यात ३ वेळा तो यशस्वी ठरला. २ वेळा अयशस्वी तर १ वेळा अम्पायर्स कॉल असा निर्णय आला.

LBW निर्णयाच्या वेळी धोनी ४६.६७%, धोनीने झेल घेतला असताना ५४.५५% आणि जवळच्या खेळाडूने झेल घेतला असताना ०% वेळा धोनी यशस्वी झाला आहे.