एबी डिव्हिलिअर्सकडे पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा

आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात पहिला ४ दिवसीय कसोटी सामना होणार आहे. १८७७साली पहिला कसोटी सामना झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ४ दिवसांच्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स प्रभारी कर्णधार म्हणून जबाबदारी पार पडणार आहे. फाफ डुप्लेसी हा ताप (viral infection) आणि खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार आहे.

जानेवारी २०१६ नंतर प्रथमच एबी डिव्हिलिअर्स कसोटी सामना खेळणार आहे. डेल स्टेनही ऑक्टोबर २०१६नंतर प्रथमच कसोटी खेळणार आहे.