Dubai Open: किदांबी श्रीकांत पहिल्याच सामन्यात पराभूत

कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला डेन्मार्कच्या विक्टर एक्सेसनकडून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

श्रीकांतचा पहिला सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या विक्टर एक्सेसन याच्याशी होता. या सामन्यात विक्टर एक्सेसनने २-० अश्या फरकाने श्रीकांतचा पराभूत केला.

सामन्याच्या सुरवातीपासूनच विक्टर एक्सेसनची सामन्यावर पकड होती. त्यामुळे एक्सेसनने पहिला सेट २१-१३ अश्या फरकाने जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतने सेट जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. परंतु हा ही सेट एक्सेसन आपल्या अनुभवाच्या जोरावर २१-१७ अश्या फरकाने जिंकवून सामनाही जिंकला.

किदांबी श्रीकांतचा आजचा सामना ताइवानच्या टीएन चेन चोऊशी आहे. हा सामना दुपारी ४:३० वाजता सुरु होईल.