सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज २०१९ स्पर्धेत पृथ्वीराज दुधाने, अमेय साळवनकर, अथर्व येलभर यांचे विजय

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात पृथ्वीराज दुधाने, अमेय साळवनकर, अथर्व येलभर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

दिलीप वेडेपाटील स्पोर्ट्स अकादमी येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात पाचव्या मानांकित पृथ्वीराज दुधानेने अचिंत्य कुमारला 5-2 असे पराभूत केले. अमेय साळवनकर याने ईशान ओकचा 5-1 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. अथर्व येलभरने तनिश देवरेला 5-1 असे नमविले. चौथ्या मानांकित नमिश हूडने शौमिल गुप्ताचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

पहिली फेरी: 10वर्षाखालील मुले:

पृथ्वीराज दुधाने(5)वि.वि.अचिंत्य कुमार 5-2;
अमेय साळवनकर वि.वि.ईशान ओक 5-1;
अथर्व येलभर वि.वि.तनिश देवरे 5-1;
नमिश हूड(4) वि.वि.शौमिल गुप्ता 5-0;
संयम पाटील(3) वि.वि.ओंकार हांडे 5-2;
त्रिशिक वाकलकर वि.वि.क्षितिज देशपांडे 5-1;
समिहन देशमुख वि.वि.तनिश रोकडे 5-1.