दक्षिण आफ्रिकेचा हशीम आमला जखमी, या खेळाडूची ३ वर्षाने संघात वर्णी

30 सप्टेंबर ते 6 आॅक्टोबर दरम्यान  दक्षिण अफ्रिका आणि झिम्बॉब्वे यांच्यात वन-डे मालिका होणार आहे. त्यासाठी जेपी ड्युमिनीची दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

जखमी हाशिम आमलाच्या जागी डिन एल्गारची निवड करण्यात आली आहे. एल्गार 3 वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेच्या संघात पुनरागमन करणार आहे. तो इंग्लडमधील काऊंटी क्रिकेट खेळून आला आहे.

किम्बर्ले येथे रविवारपासून सूरू होणाऱ्या वन-डे मालिकेतून  खांद्याच्या दुखापतीमुळे कर्णधार फाफ डू प्लेसिस बाहेर बसणार आहे.

आताच संपलेल्या कॅराबियन प्रिमिअर लीग मध्ये हाशिम आमलाच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी कमीत कमी 3 आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे दक्षिण अफ्रिकेचे संघ व्यवस्थापक डॉ. मोहम्मद मोसाजी यांनी सांगितले.

फिरकी गोलंदाज केशव महाराजला डॉल्फिन्स  संघाकडून टायटन्सविरूद्ध  सुपरस्पोर्ट पार्क येथे चार दिवसांच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठीची मार्ग मोकळा झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात

Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो

टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव