हा खेळाडू ठरला टी२० मध्ये शतक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू

इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड हा जगातील टी२० मध्ये शतक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. आज नेटवेस्ट टी२० ब्लास्ट स्पर्धेत त्याने हे शतक केले.

पॉल कॉलिंगवूडचे सध्या वय ४१ वर्ष आणि ६५ दिवस आहे. यापूर्वी हा विक्रम ग्रॅम हिकच्या नावावर होता. त्याने ४१ वर्ष आणि ३७ दिवसांचा असताना टी२० प्रकारात शतकी खेळी होती.

पॉल कॉलिंगवूड डरहम क्लब कडून खेळताना आज ६० चेंडूत १०८ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. कॉलिंगवूडच्या शतकाच्या जोरावर डरहम क्लबने २० षटकांत २०१ धावा केल्या.