एशियन गेम्स: केवळ ०.२४ सेंकदाने हुकले सुवर्णपदक

इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारतीय धावपटू दूती चंदने महिलांच्या 200 मीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले आहे. तिचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक असून 26ऑगस्टला 100 मीटरच्या शर्यतीतही तीने रौप्य पदकाची कमाई केली आहे.

200 मीटरची शर्यत चंदने 23.20 सेंकदात पूर्ण केली तर सुवर्णपदक जिंकणाऱ्या बहरिनच्या एडीडीओंग ओडीओंगने 22.96 सेंदकात पूर्ण केली. यामुळे चंदचे सुवर्णपदक 0.24 सेंकदांनी हुकले.

तर चीनच्या योंग्लेइ वेइला कास्यंपदक मिळाले तीने 23.20 शर्यत पूर्ण केली पण चंद पात्रता फेरीत 23 सेंकदासह पहिल्या स्थानावर होती यामुळे तिला रौप्यपदक मिळाले.

32 वर्षांनंतर भारताला पहिल्यांदाच 100 आणि 200 मीटरमध्ये पदक मिळाले आहे. 1986ला पीटी उषाने 100मीटरमध्ये रौप्य तर 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

चार वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या चंदने दोन रौप्य पदके जिंकली आहेत.

वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या हायपरअड्रोजेनीजम पॉलिसीनुसार तिला 2014च्या राष्ट्रकुलमध्ये सहभागी होता आले नाही. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाला अधिक पुरावे सादर न करता आल्याने कोर्ट ऑफ अरबिट्रेशनने तिला परत शर्यतीत सहभागी होण्याची संधी दिली.

“2014 वर्ष माझ्यासाठी खुप कठिण होते. चार वर्षानंतर परत ट्रॅकवर येऊन पदक जिंकणे माझ्यासाठी खुप मोठी बाब आहे”, असे चंद म्हणाली.

“हे पदक माझ्यासाठी ऑलिंपिकसारखेच असून हे जिंकून मी बदला घेतला आहे”, असे 22 वर्षीय चंद 100 मीटरचे रौप्यपदक जिंकल्यावर म्हणाली.

18 व्या एशियन गेम्समधील पदतालिकेत भारत 53 पदकांसह नवव्या स्थानावर आहे. यामध्ये 10 सुवर्ण, 20 रौप्य आणि 23 कास्यं पदकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक

एशियन गेम्स: डोळे मिटून १००मीटर शर्यत पूर्ण केली